Near by places of our resort

Save the Nature

13Nov

जागतिक पर्यावरणदिनी करू या संकल्प, वाचवू या राष्ट्रीय वृक्ष!”- डॉ रेखा महाजन व निसर्गशाला परिवार व आर्यन इको रिसॉर्ट

वटवृक्ष हा आमचा राष्ट्रीय वृक्ष ! अन्य झाडांच्या तुलनेत सर्वाधिक प्राणवायू हवेत सोडणारा असा हा वृक्षसम्राट वड ! जळगांव शहरातील गिरणापंपिंग रोडवर सावखेडा शिवारात रस्त्याच्या दुतर्फा ५०/६० वर्ष जुनी, मोठमोठ्यापारंब्या असलेली व भर उन्हाळयात हिरवागार पर्णसंभार असलेली वटवृक्ष मोठ्या दिमाखात येणाऱ्या जाणाऱ्यांना विसावा देत उभी आहेत. केवळ त्या रस्त्याची नव्हे तर जळगांव शहराची शान असलेली हि वृक्ष आहेत.

गेल्या १८ वर्षांपासून सकाळी नित्यनियमाने आर्यन इको रिसॉर्टला जाण्यायेण्याचा आमचा हा रस्ता तेथील वड, नीम, बूच, अशा वृक्षराजी, लांबलचक पारंब्या असलेली हि जुनी वटवृक्ष,रंगविरंगी पक्षांचा मुक्तसंचार या सर्वांचे आम्ही दोघे जवळचे साक्षीदार आहोत, परंतु गेल्या काही वर्षांपासून तिथे आजूबाजूच्या वस्त्यांमधील अनेक लोकं येत असतात बकऱ्या चरायला पानं हवी म्हणून किंवा लग्नसमारंभांना वडाची पानं लागतात म्हणून झाडांवर चढुन फांद्या तोडणे झाडं तोडणे, कोवळी पानं ओरबडणे इ. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी करीत असतात, कित्येकदा आम्ही गाडी थाबवून त्यांना झाडावरून उतरवून, रागवून , धमकावून, कायद्याचा बडगा दाखवून झाडांच महत्व सांगून हि वडाची झाड वाचवण्याचा प्रयत्न करीत असतो.

त्यात भर म्हणून आज आणखी एक मनाल वेदना देणारा व चीड आणणारा प्रसंग घडला . सावखेडा शिवारातील एक शेतकऱ्याने बान्धकोपरे साफ करून काडीकचरा जाळण्याचा नादात लावलेली आग म्हणता म्हणता विशालकाय वडाच्या बुंध्यापर्यंत पोहोचली पण जवळ उभ्या असलेल्या शेतकऱ्याला त्याचं अजिबात गाम्भीर्य नव्हतं , गाडी थांबवुन आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. झाड जाळणं हा अक्षम्य गुन्हा आहे. याची जाणीव त्याला दिली व पुन्हा असा करू नकोस, असा समजावून आम्ही निघालो.

मित्रांनो पण हे एकट्याच काम नाही. ह्या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी थांबवणे हे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे.
५ जुन ला येणाऱ्या पर्यावरणदिना निमित्ताने विविध संस्थांनी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून कार्याला सुरवात केली आहे. ह्यावर्षी आम्ही पण july /august मध्ये २५,००० रोपे वाटप व वृक्षलागवडीचे संकल्प केलेला आहे.
पण मित्रांनो , “पर्यावरणदिनाच्या निमित्ताने आपण सगळे मिळून अजून एक संकल्प करू या वृक्षलागवडीबरोबरच आपल्या जळगांव शहराचा वारसा सांगणाऱ्या या राष्ट्रीय वृक्षांचे संवर्धन व जतन आपण सगळे मिळून करूया.”

Gandhi Jayanti Initiative

28Dec

आज महात्मा गांधी या महापुरुषाची 150 वी जयंती! खरतर गांधी जयंती हा फक्त एक दिवस साजरा करण्याचा सण नाही किंवा गांधी ही व्यक्तिपुजा पण नाही, तर गांधी ही एक विचारधारा आहे. त्यांच्या थोर विचारांचे आचरण आपण आपल्या व्यक्तीगत व व्यवसायिक जीवनात कसे करू शकतो यावर गेल्या काही दिवसापासून विचारमंथन सुरू होते. हा विचार आर्यन इको रिसॉर्ट मधील सर्व कर्मचारांच्या समोर मांडल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक संकल्प केला तो म्हणजे “संपूर्णपणे प्लास्टीकमुक्त रिसॉर्ट करण्याचा!” प्लास्टिकला पर्याय शोधून बांबू, लाकूड, माती, विविध धातू यासारख्या माध्यमांचा व नैसर्गिक व विघटनशील वस्तूंचा वापर करणे सुरू केले व गेल्या काही महिन्यात ९९% प्लास्टिकमुक्त रिसॉर्ट करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे.
गांधीच्या विचारधारेचा सन्मान ठेवून स्वछभारत अभियान, वृक्षलागवड व संवर्धन, जलसंधारण, प्लास्टिककचरा निर्मूलन यासारखे उपक्रम हे तात्पुरते न करता ही आपली जीवनशैलीच असावी हा विचार स्वतः मध्ये व कर्मचार्याकमध्ये रुजवून प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे कार्य आर्यन इको रिसॉर्टच्या माध्यमातून सुरू आहे. आजच्या या दिवशी या महापुरुषाच्या स्मृतीस अभिवादन!