जागतिक पर्यावरणदिनी करू या संकल्प, वाचवू या राष्ट्रीय वृक्ष!”- डॉ रेखा महाजन व निसर्गशाला परिवार व आर्यन इको रिसॉर्ट
वटवृक्ष हा आमचा राष्ट्रीय वृक्ष ! अन्य झाडांच्या तुलनेत सर्वाधिक प्राणवायू हवेत सोडणारा असा हा वृक्षसम्राट वड ! जळगांव शहरातील गिरणापंपिंग रोडवर सावखेडा शिवारात रस्त्याच्या दुतर्फा ५०/६० वर्ष जुनी, मोठमोठ्यापारंब्या असलेली व भर उन्हाळयात हिरवागार पर्णसंभार असलेली वटवृक्ष मोठ्या दिमाखात येणाऱ्या जाणाऱ्यांना विसावा देत उभी आहेत. केवळ त्या रस्त्याची नव्हे तर जळगांव शहराची शान असलेली हि वृक्ष आहेत.
गेल्या १८ वर्षांपासून सकाळी नित्यनियमाने आर्यन इको रिसॉर्टला जाण्यायेण्याचा आमचा हा रस्ता तेथील वड, नीम, बूच, अशा वृक्षराजी, लांबलचक पारंब्या असलेली हि जुनी वटवृक्ष,रंगविरंगी पक्षांचा मुक्तसंचार या सर्वांचे आम्ही दोघे जवळचे साक्षीदार आहोत, परंतु गेल्या काही वर्षांपासून तिथे आजूबाजूच्या वस्त्यांमधील अनेक लोकं येत असतात बकऱ्या चरायला पानं हवी म्हणून किंवा लग्नसमारंभांना वडाची पानं लागतात म्हणून झाडांवर चढुन फांद्या तोडणे झाडं तोडणे, कोवळी पानं ओरबडणे इ. पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी करीत असतात, कित्येकदा आम्ही गाडी थाबवून त्यांना झाडावरून उतरवून, रागवून , धमकावून, कायद्याचा बडगा दाखवून झाडांच महत्व सांगून हि वडाची झाड वाचवण्याचा प्रयत्न करीत असतो.
त्यात भर म्हणून आज आणखी एक मनाल वेदना देणारा व चीड आणणारा प्रसंग घडला . सावखेडा शिवारातील एक शेतकऱ्याने बान्धकोपरे साफ करून काडीकचरा जाळण्याचा नादात लावलेली आग म्हणता म्हणता विशालकाय वडाच्या बुंध्यापर्यंत पोहोचली पण जवळ उभ्या असलेल्या शेतकऱ्याला त्याचं अजिबात गाम्भीर्य नव्हतं , गाडी थांबवुन आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. झाड जाळणं हा अक्षम्य गुन्हा आहे. याची जाणीव त्याला दिली व पुन्हा असा करू नकोस, असा समजावून आम्ही निघालो.
मित्रांनो पण हे एकट्याच काम नाही. ह्या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी थांबवणे हे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे.
५ जुन ला येणाऱ्या पर्यावरणदिना निमित्ताने विविध संस्थांनी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवून कार्याला सुरवात केली आहे. ह्यावर्षी आम्ही पण july /august मध्ये २५,००० रोपे वाटप व वृक्षलागवडीचे संकल्प केलेला आहे.
पण मित्रांनो , “पर्यावरणदिनाच्या निमित्ताने आपण सगळे मिळून अजून एक संकल्प करू या वृक्षलागवडीबरोबरच आपल्या जळगांव शहराचा वारसा सांगणाऱ्या या राष्ट्रीय वृक्षांचे संवर्धन व जतन आपण सगळे मिळून करूया.”