OUR BLOG

ACTIVITIES IN RESORT

Grown Trees at Aryan Eco Resort

13Nov

भर उन्हाळातही जगवली देशी झाडांची रोपवाटिका. (निसर्गशाळा )

जळगांवचा प्रचंड उन्हाळा ,पाण्याचे दुर्भीक्ष खरतर ही रोपे बनवण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती! पण या सगळ्यांचे आव्हान स्वीकारून अडीच महिन्यापूर्वी मनोमनी संकल्प केलेल्या कार्याला सुरुवात झाली. ते कार्य होते , देशी व दुर्मिळ झाडांची रोपवाटिका बनवणे व वृक्षलागवड व संवर्धनाबाबत संवेदनशील असलेल्या संस्था किंवा नागरिकांना ती रोपे मोफत वाटप करणे

आमच्या शेतातील निसर्ग मित्रांच्या साहाय्याने बीजसंकलन करून ती रोपे रुजवली .आलेल्या अडचणींवर मात करून पाण्याचे उत्तम व्यवस्थापन करीत म्हणता म्हणता बी रुजून, त्याला कोंब फुटून हिरवीगार रोपे तरारून वर आली निंब, बकुळ, कांचन, चिंच, जंगलीबादम, पळस, अंजन, अशी एक ना अनेक प्रकारच्या देशी झाडांची एक सुंदर रोपवाटिका तयार झाली. त्यामुळे aryan इको रिसॉर्टच्या सौंदर्यात आणखी भर पडली व त्यात ह्या आठवडयात पडलेल्या पावसाने तर जणु रोपांना संजीवनीच मिळाली. रोपे वाटपाचे हे कार्य आमच्या संस्थे मार्फत august मध्ये केले जाणार आहे.

रामदास स्वामी म्हणतात,

रोपे वाटीत जावे | करावा हाचि धर्मं

कथन फक्त नसावे | व्हावे रोपण कर्म.