नमस्कार,
निसर्गशाळा- Nurture the Nature.
“निसर्ग आपणास भरभरून देतो आणि विसरून जातो.
माणूस त्यापासून सर्व काही घेतो व विसरून जातो.
आपण त्याचा देण्याचा गुण थोडा तरी घेवू या”.
हा आमच्या निसर्गशाळेचा उद्देश!
ह्याच सुंदर विचारांनी प्रभावित होवून 2000 साली आम्हा उभयंतांच्या हातून नकळत एका चांगल्या कार्याला सुरुवात झाली ती म्हणजे “वृक्षलागवड व संवर्धन” कृषिप्रधान कुटुंबाचा वारसा असल्याने आणि शेती व निसर्ग यांची आम्हा दोघांना प्रचंड आवड असल्यामुळे शहरालगत असलेल्या एका पडीक, बखळ शेतीजमिनीवर वृक्षलागवडीचे काम सुरू झाले जे आजतागायत सुरू आहे. 19 वर्षाच्या या दीर्घकाळात शेतावर राबणार्याग भूमिपुत्रांच्या मदतीने व शेततळ्याच्या माध्यमातून पाणायाचे व्यवस्थापन करीत जवळ-जवळ 30,000 झाडे आर्यन फार्मवर लावली व जगवली गेली आणि गिरणेच्या काठावरील या उजाड माळरानाचे “आर्यन इको रिसॉर्टच्या” रुपानं नंदनवन झाले.
पण येत्या काही वर्षात प्रचंड तापमानवाढ, पाण्याचे दुर्भिक्ष व पर्यावरणीय विषम बदल बघता ह्या वर्षा एक संकल्प केला.
देशी व दुर्मिळ झाडांची रोपे बनवून किमान 25,000 रोपे ही शाळा, सामजिक संस्था व इच्छुक आणि जबाबदार नागरीकांना “आर्यन इको रिसॉर्ट” निसर्गशाला – Nurture the nature” या प्रकल्पातून मोफत देण्यात येतील व हा संकल्प येत्या जून ते ऑगस्ट च्या दरम्यान अमलात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे
त्याचा पहिला टप्पा म्हणजे “बीजसंकलन”. आमच्या शेतावरील निसर्गमित्र कार्यकर्ते ( सातपुडयातील आदिवासी बांधव ) ज्यांची शाळेत जाणारी मुलं सुटयांसाठी शेतावर आली होती त्या सर्व वानर सेनेला सोबत घेवून २५ एकरच्या त्या परिसरातून देशी झाडांच्या हजारो बियांचे संकलन केले, खरतर हरित क्रांतीचं महत्व त्यांना या वयात उमगलं अस वाटलं, मुलं रोज उत्साहाने पिशव्या घेवून परिसरात फिरून बिया जमवून, आणीत असतं, करंज , जंगलीबदाम, कांचन, बकुळ, काटेसावर, पळस, चिंच, बोर,… अर्जुनसादडा…असे एक ना अनेक प्रकारचे देशी वाण जमा करीत कामाला सुरुवात झाली………………..
चला तर या हरित प्रकल्पात आपण सगळेच सहभागी होवू या…..
डॉ. रेखा, डॉ. रवी, अनुशा व निसर्गशाळा परिवार
टीप:- ज्या सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज आणि इच्छुक नागरीकांना रोपे हवी असतील त्यांनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. संपर्क क्रमांक :- 7249817333