आज महात्मा गांधी या महापुरुषाची 150 वी जयंती! खरतर गांधी जयंती हा फक्त एक दिवस साजरा करण्याचा सण नाही किंवा गांधी ही व्यक्तिपुजा पण नाही, तर गांधी ही एक विचारधारा आहे. त्यांच्या थोर विचारांचे आचरण आपण आपल्या व्यक्तीगत व व्यवसायिक जीवनात कसे करू शकतो यावर गेल्या काही दिवसापासून विचारमंथन सुरू होते. हा विचार आर्यन इको रिसॉर्ट मधील सर्व कर्मचारांच्या समोर मांडल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक संकल्प केला तो म्हणजे “संपूर्णपणे प्लास्टीकमुक्त रिसॉर्ट करण्याचा!” प्लास्टिकला पर्याय शोधून बांबू, लाकूड, माती, विविध धातू यासारख्या माध्यमांचा व नैसर्गिक व विघटनशील वस्तूंचा वापर करणे सुरू केले व गेल्या काही महिन्यात ९९% प्लास्टिकमुक्त रिसॉर्ट करण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे.
गांधीच्या विचारधारेचा सन्मान ठेवून स्वछभारत अभियान, वृक्षलागवड व संवर्धन, जलसंधारण, प्लास्टिककचरा निर्मूलन यासारखे उपक्रम हे तात्पुरते न करता ही आपली जीवनशैलीच असावी हा विचार स्वतः मध्ये व कर्मचार्याकमध्ये रुजवून प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे कार्य आर्यन इको रिसॉर्टच्या माध्यमातून सुरू आहे. आजच्या या दिवशी या महापुरुषाच्या स्मृतीस अभिवादन!